नांगर खरेदीसाठी अनुदान मिळणारच,कोणताही नांगर खरेदी करा,अशा प्रकारे फॉर्म भरा : agriculture machine scheme 2023

agriculture machine scheme 2023 :  महाराष्ट्र राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नामधून सदर योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे.यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.यामध्ये शेतकरी यांना विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान दिले जाते.

उदा. नांगर रोटर व स्वयंचलित औजारे रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड)अशा असंख्य मनुष्यचलीत व बैलचलीत औजारे यामध्ये आपल्याला मिळणार आहेत.शेतकरी बंधुनो हा फॉर्म आपणा जर भरला तर आपण यामध्ये १००% पात्र होऊ शकता.त्यासाठी हा फॉर्म जास्तीत जास्त शेतकरी वर्ग यांनी भरावा यासाठी सरकार कडून प्रयत्न सुरु आहेत. agriculture machine scheme 2023

agriculture machine scheme 2023

सदर योजना हि MAHADBT अंतर्गत असून शासनाकडून राबविण्यात येत असून  यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी आधार क्रमाांक आवश्यक आहे परंतु आपल्याकडे आधार कार्ड काढल्याची पावती असल्यास आपण यामध्ये सहभागी होऊ शकता.

आवश्यक कागदपत्रे:

  • .आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • सात बारा व आठ अ उतारा
  • मोबाईल क्रमांक
  • इमेल

अनुदान किती मिळेल?

या योजनेत आपण जर पात्र झालात तर यासाठी सरासरी४० ते  ५० % पर्यंत अनुदान आहे.

नांगर योजना अर्ज कसा करावा:

सदर योजनेचा अर्ज हा ऑनलाईन स्वरुपात असूनhttps://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर भरणे आवश्यक आहे.

  • शेतकरी  सीएससी सेंटर मध्ये  किंवा घरी देखील  हा अर्ज भरु शकतात.
  • या संकेत स्थळावर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडायचा आहे.
  • शेतकरी यांना “वैयक्तीक लाभार्थी” तसेच “शेतकरी गट/एफपीओ/सहकारी संस्था” म्हणुन नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
  • प्रथम युजर नेम आणि पासवर्ड तयार करुन आपले खाते उघडायचे आहे.नोंदणी मध्ये आपले सर्व आवश्यक माहिती जसं की आपला आधार कार्ड, बँकेची डिटेल ,मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, हे सर्व माहिती टाकून आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे,
  • नोंदणी केल्याच्या नंतर आपले वैयक्तिक माहिती याच्या व्यतिरिक्त आपल्या संपूर्ण सातबारा ची माहिती जसं की सातबारा खाते क्रमांक, सातबारा क्रमांक, क्षेत्र किती आहे, सामायिक असेल तर त्याची माहिती, ही सर्व माहिती टाकून आपल्याला नांगर योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
  •   अर्ज  ऑनलाइन स्वरूपामध्ये सबमिट होईल
  • कृषी यांत्रिकीकरण येहे क्लिक करायचे आहे,
  • त्यानंतर कृषी यंत्र खरेदीसाठी अर्थसहाय्य पर्याय निवडावा
  • त्यानंतर ट्रक्टर चल औजारे हा पर्याय निवडा
  • त्यानंतर किती  hp ट्रक्टर आहे हा पर्याय निवडावा
  • त्यानंतर आपल्याला जो नांगर हवा आहे तो पर्याय निवडावा
  • आपला जुना नांगर आपल्याला हवा असेल तर मोल्ड बोलट नांगर हा पर्याय निवडा
  • व जर हायड्रोलिक हवा असेल तर तो पर्याय निवडा इतर पर्याय निवडू नयेmahadbt login
  • त्यानंतर .20 व जीएसटी रु.3.60 असे एकुण 23.60 रुपये ऑनलाईन शुल्क भरायचे आहे.शेतकरी यांना अर्ज करताना काही अडचण येत असेल किंवा त्यांना काही सुचना करावयाच्या असतील तर महाडीबिटी पोर्टल वरील “तक्रार/सुचना” या बटन वर क्लिक करुन आपली सुचना नोंदवू शकतात.

फॉर्म कसा भरावा सविस्तर व्हिडिओ पहा येथे

लाभार्थी निवड कशी होते ते पहा?

संगणकीय प्रणालीद्वारे सर्व योजनांसाठी एकत्रित ऑनलाईन सोडत काढली जाते. निवड झालेल्या शेतकरी यांना त्यांच्या मोबाईल वर एसएमएस येईल.  ज्या लाभार्थी यांची निवड झाली नाही आणि ते प्रतिक्षा यादीत आहेत अशा लाभार्थी यांना पुढील वर्षी त्याच बाबीसाठी लाभ घेण्यास इच्छुक असल्यास त्यांना महाडीबिटी पोर्टल वर मागिल वर्षाचा अर्ज ग्राह्य धरण्याचा पर्याय निवडावा. त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.शेतकरी यांच्या अर्जाची व कागदपत्रांची ऑनलाईन छाननी करण्यात येते व पात्र ठरलेल्या शेतकरी यांना पुर्व सम्मती आदेश ऑनलाईन देण्यात येतो व त्याबाबतचा एसएमएस शेतकरी यांच्या मोबाईल वर पाठवला जातो. शेतकरी यांना पुर्वसंमती आदेश महाडीबिटी पोर्टल वरील त्यांच्या लॉगइन मध्ये उपलब्ध होइल. पुर्वसंमती आदेश पाहण्यासाठी त्यांचा युजरआयडी व पासवर्ड टाकुन पाहू शकतील.त्याच प्रमाणे अर्जाच्या विविध टप्प्यांवर लाभार्थी शेतकरी यांना SMS येईल. किंवा कृषी अधिकारी आपणास समपर्क करतील

अधिक माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top