Free Gas Yojana 2024 : नमस्कार माता आणि भगिनींनो आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर राज्य शासनामार्फत एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे मार्फत महिलांना वर्षातून 3 एलपीजी गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहे. तर कोणती आहे ही नेमकी योजना व या योजनेचा लाभ आपल्याला कशाप्रकारे मिळणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. Free Gas Yojana 2024
Free Gas Yojana 2024
तर भगिनींनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या लेखनाला सुरुवात करूयात.
नवीन योजना
भगिनींनो राज्य शासनाच्या वतीने महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली होती, परंतु आता त्याच बरोबर राज्य शासनाने नवीन योजना म्हणजे अन्नपूर्णा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. या योजने च्या माध्यमातून महिलांना वर्षात तीनदा एलपीजी गॅस सिलेंडर हे मोफत देण्यात येणार आहे. तर या योजनेचे आवश्यक कागदपत्रे, अटी व शर्ती, पात्रता व अर्ज प्रक्रिया पाहुयात. Free Gas Yojana 2024
पात्रता
- भगिनींनो सर्वप्रथम ज्या महिलांना पीएम उज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळालेले आहे त्यांना या योजनेचा थेट लाभ देण्यात येणार आहे.
- तसेच ज्या महिलांना आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील त्यांना देखील या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
अटी व शर्ती
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी एलपीजी गॅस सिलेंडर पुस्तक हे महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे.
- तसेच त्यांनी अध्यात आपली एलपीजी सिलेंडरची केवायसी केलेले असणे आवश्यक आहे, केवायसी केलेली नसेल तर तात्काळ मध्ये आपल्या गॅस वितरकाकडे ही केवायसी करून घ्यावे.
लाभ कसा मिळणार ते पहा
तर राज्य शासनामार्फत यासाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला असून, या योजनेअंतर्गत सर्वप्रथम तर आपल्याला प्रत्येक वेळेस आपण ज्या प्रकारे एलपीजी गॅस सिलेंडर खरेदी करतो व त्याची संपूर्ण पैसे देतो त्याचप्रमाणे आपल्या प्रक्रिया करायचे आहे.
तसेच आपण संपूर्ण रक्कम जमा केल्यानंतर या योजनेअंतर्गत आपल्याला आपण एलपीजी गॅस सिलेंडर वर जेवढी रक्कम अदा केली आहे तेवढी रक्कम थेट आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
तसेच ज्या महिलांना पीएम उज्वला योजनेअंतर्गत प्रत्येक टाकी मागे सबसिडी मिळत आहे त्यांना सबसिडी व उर्वरित गॅसची रक्कम अदा करण्यात येणार आहे.
योजनेची सुरुवात कधीपासून होणार ते पहा
तर या संदर्भात फक्त शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला असून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये या योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात येणार आहे.
आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर माता-भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.
अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा
सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा