PVC Pipe subsidy साठी अर्ज भरत असताना आपल्याकडे उपलब्ध असणारा चिंच नाचा स्त्रोत याविषयी माहिती अर्जामध्ये आपल्याला व्यवस्थित नमूद करायचा आहे. उदाहरणार्थ विहीर, बोरवेल, शेततळे किंवा इतर कोणत्या माध्यमातून आपण सिंचन करत आहात याविषयीची माहिती यात द्यायची आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित अर्ज भरायचा आहे.
हे पूर्ण केल्यावर काही काळानंतर सरकारकडून ठराविक अर्जदारांची निवड केली जाईल. त्या नंतर महाडीबीटी या वेबसाईटवर एक लॉटरी जाहीर होईल. या जाहीर झालेल्या यादीमध्ये आपले नाव असेल तरच आपल्याला या योजनेचे लाभ घेता येणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ते कागदपत्रे ऑनलाईन जमा करावे लागतील.
अनुदान किती मिळणार आहे ते पहा
शेतकरी बंधूंनो यामध्ये आपल्याला अनुदान 50 टक्के किंवा 15 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे
आवश्यक कागदपत्रे:-
- आधार कार्ड.
- शेत जमिनीचा ७/१२ उतारा.
- ८ अ चा उतारा.
- ज्या ठिकाणाहून पाईप खरेदी करणार आहोत त्या दुकानदार चे कोटेशन.
- बँक पासबुक.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा