Annasaheb Patil Loan Scheme 2024: अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, मिळवा 15 लाख रुपये पर्यंत कर्ज, येथे करा ऑनलाईन अर्ज.

Annasaheb Patil Loan Scheme 2024 : महाराष्ट्र  राज्यातील युवकांच्या भविष्यासाठी विविध सरकारी योजना सुरु करत असते.त्या योजनांपैकीच एक योजना Annasaheb Patil Karj Yojana आहे.महाराष्ट्र शासन राज्यातील युवकांच्या भविष्यासाठी विविध सरकारी योजना सुरु करत असते.त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव Annasaheb Patil Karj Yojana आहे.या  योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सुशिक्षित कुशल  मराठा समाजातील तरुणांना स्वतःचा नवीन उद्योग सुरु करण्यासाठी किंवा सुरु असलेल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी १० लाखांपासून  ते ५० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो.

Annasaheb Patil Loan Scheme 2024:

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादीत मुंबई या महामंडळाची स्थापना शासन निर्णय क्र. अमामं 1998/प्र.क्र.363/रोस्वरो-1, दि.27/11/1998 अन्वये करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यात ज्या जाती जमातीसाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या लक्षात घेऊन या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी, त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणाऱ्या अडचणी दूर करणे, असा या महामंडळाचा उद्देश आहे. हे कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत आहे.

महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्यावतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली.
राज्यातील बेरोजगारी बघता मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे,त्यांना व्यवसायामध्ये उभारी घेता यावी,व उद्योग क्षेत्रात राज्याचा विकास व्हावा यासाठी आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना अत्यंत सोप्या पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास व्याज महामंडळ भरते. यामुळे युवकांना व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो. मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. Annasaheb Patil Loan Scheme 2024

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत खालील योजना आहेत

१. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
२. गट कर्ज व्याज परतावा योजना
३. गट प्रकल्प कर्ज योजना

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील व्यक्तींना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केले जाते तसेच लाभार्थ्याने कर्जाचे हफ्ते वेळेत भरल्यास त्या हफ्त्याच्या व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या साहाय्याने जमा करण्यात येत असते. योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठी ४ टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो.गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत १० लाख ते ५० लाखांपर्यंत कर्ज देण्यात येते व कर्जाचा परतफेड कालावधी ५ वर्षासाठी निर्धारित केले गेलेला आहे.या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उमेदवारांच्या बचत गट,भागीदारी संस्था,सहकारी संस्था,कंपनी अशा शासन प्रमाणित संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया पहा

 

येथे करा ऑनलाईन अर्ज

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top