Mukhyamantri Mazi Ladki Bahan Yojana : नमस्कार माता भगिनींनो आज आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की कालच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ची घोषणा केलेली होती. त्यासाठी आज एक शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये कोण या योजनेसाठी पात्र ठरणार आहे, या योजनेसाठी अर्ज कसा करता येणार आहे ,या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत या योजनेची अटी व शर्ती कोणती आहेत,संपूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे. Mukhyamantri Mazi Ladki Bahan Yojana
Mukhyamantri Mazi Ladki Bahan Yojana
तर माता भगिनींनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपण या योजनेसाठी पात्र आहोत का नाही व आपल्याला यासाठी अर्ज कशाप्रकारे करता येणार आहे याविषयीची माहिती मिळेल.
या योजनेसाठी पात्रता
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी विवाहित, घटस्फोटीत, विधवा व निराधार महिला यासाठी अर्ज करू शकतात.
- या योजनेसाठी 21 ते 60 या वयोगटातील महिला यासाठी अर्ज करू शकतात.
- या योजनेसाठी महिलांना जर अर्ज करायचा असेल तर त्यांचे स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक आहे व ते खाते त्यांच्या आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.
यासाठी कोण अर्ज करू शकत नाही
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त आहे ते यासाठी अपात्र आहेत.
- ज्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी खाते मध्ये किंवा जॉब करत आहेत त्यांना याचा लाभ मिळणार नाही.
- ज्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरतात त्यांना याचा लाभ मिळणार नाही.
- या योजनेचे लाभ घेण्यासाठी पात्र महिलेने याच्या आधी दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थी महिलेचे स्वतंत्र बँक खाते पासबुक
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दाखला 2.5 लाख पेक्षा कमी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
अर्ज प्रक्रिया कशी असणार
- या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
- या योजनेचे अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे
- महिलांना यासाठी मोफत फॉर्म भरता येणार आहे
- ऑनलाइन अर्ज भरत असताना महिला समोर उपस्थित असणे आवश्यक आहे.
तर माता आणि भगिनींनो अशाप्रकारे राज्य शासनामार्फत हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला असून 1 जुलै 2024 पासून यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे.
शासन निर्णय पहा
संपूर्ण अर्ज प्रक्रिया वेळेवर माहिती व्हावी यासाठी आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा
👇👇👇👇
Whatsapp ग्रुप जॉईन करा