Ration Card Online : रेशन कार्ड हरवले आहे? काळजी करू नका, असे काढा रेशन कार्ड घरबसल्या, पहा एकदम सोपी प्रक्रिया.

  Ration Card Online : शेतकरी बंधूंनो, आपलं जर रेशन कार्ड हरवला असेल तर आपल्याला काळजी करायची आवश्यकता नाही. आता आपल्याला रेशन कार्ड काढण्यासाठी तहसीलदार कार्यालय या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. आपण घरबसल्या आपल्या रेशन कार्ड आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता. Ration Card Online

तर ते कशा पद्धतीने डाऊनलोड करायचे आहे, याबद्दलची माहिती आपण आजचे या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग हा लेख सुरू करूया.

Ration Card Online  :

बंधूंनो, आपल्याला जर आपलं रेशन कार्ड डाऊनलोड करायचा असेल तर अगदी काही मिनिटांमध्ये आपण आपलं रेशन कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता व हे डाउनलोड केलेले रेशन कार्ड यावरती आपण तलाठी भाऊसाहेब यांची सही आणि शिक्का मारून ते अधिकृतरित्या कोणत्याही ठिकाणी आपण वापरू शकता. Ration Card Online

हे रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात असल्यामुळे आपण कुठेही डाऊनलोड करू शकता. आपलं काम मार्गी लावू शकता.

Digital ration card download process  :

डिजिटल स्वरूपातील रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी पुढील प्रक्रिया आहे

1. सर्वप्रथम आपल्याला https://rcms.mahafood.gov.in/   या वेबसाईट वरती जायचं आहे.

2. त्यानंतर रेशन कार्ड या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचा आहे.

3. त्यानंतर know your ration card या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचा आहे.

4. त्यानंतर आपल्याला कॅपच्या कोड व्हेरिफाय करायला विचारलं जाईल खाली जो कॅपचा असेल तो त्या ठिकाणी टाकून आपल्याला वेबसाईट वेरिफाय करायचा आहे.

5. त्यानंतर रेशन कार्ड नंबर ओल्ड रेशन कार्ड नंबर विचारला जाईल या ठिकाणी आपल्याला आपला बारा डिजिटल ऑनलाईन रेशन कार्ड नंबर टाकणे आवश्यक आहे.

6. इतर जर नंबर टाकला तर आपला रेशन कार्ड आपल्याला दिसणार नाही.

7. 12 अंकी डिजिटल रेशन कार्ड नंबर काढण्यासाठी आपण खालील लिंक वरती क्लिक करून देखील बारा रजिस्ट्रेशन कार्ड नंबर काढू शकता किंवा आपल्या रेशन कार्ड नंबर वरती बारा डिजिटल नंबर सादर केलेला आहे तो आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे.

8. त्यानंतर गेट रिपोर्ट वरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर प्रिंट युवर रेशन कार्ड या पर्यायावर क्लिक करायचा आहे. आपल्या रेशन कार्ड आपल्याला डाऊनलोड झालेल्या दिसते. त्याची प्रिंट मारून आपण तलाठी भाऊसाहेब यांची सही घेऊ शकता. आपल्याला यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. अशा प्रकारे आपण आपले डिजिटल रेशन कार्ड काढू शकता.

👉🏻12 अंकी रेशन कार्ड नंबर काढण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻

 

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top