E Panchnama Kyc Status : शेतकरी बंधूंनो आपण जर ई-पंचनामा केवायसी केलेली नसेल तर आपणाला विनंती आहे की आपण ही पंचनामा केवायसी करून घ्या तर ती इ केवायसी कशा पद्धतीने करायची याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
E Panchnama Kyc Status
महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळ व अतिवृष्टी यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने एक केवायसी आणि अर्ज सादर करायची प्रक्रिया ही सुरू होती आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी फॉर्म सादर केले होते फॉर्म सादर केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन विशिष्ट क्रमांक सादर करून ई केवायसी करणे बंधनकारक आहे. ही केवायसी केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत E-kyc Online
E-केवायसी करताना घ्यावयाची काळजी
शेतकरी बंधूंनो आपण e-केवायसी करत असाल तर आपल्याला आपला आधार क्रमांक बरोबर मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. आपला मोबाईल क्रमांक बरोबर आहे का याची खात्री करावी बँक पासबुक खाते नंबर बरोबर आहे का याची खात्री करावी.
पैसे कोणत्या खात्यावरती जमा होणार
आधार क्रमांकाशी जी बँक लिंक असेल त्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत.
पैसे किती दिवसात जमा होणार
यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे त्यांचे पैसे तीन ते चार दिवसांमध्ये जमा झालेले आहेत परंतु सद्यस्थितीला जर आपण केवायसी केली तर हे पैसे देखील तीन ते चार दिवसांमध्ये जमा होऊ शकतात किंवा शासनाच्या आदेशानुसार कोणते क्षणी पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाऊ शकतात E-Panchnama Kyc Online Maharashtra
केवायसी साठी आवश्यक कागदपत्रे
केवायसी करण्यासाठी फक्त विशिष्ट क्रमांकाची आवश्यकता आहे. तो क्रमांक आपल्याला आपल्या तालुका कृषी अधिकारी यांनी सादर केलेल्या यादीमध्ये मिळेल.
केवायसी घरबसल्या मोबाईल वरती होईल का ?
केवायसी ही घरबसल्या मोबाईल वरती होणार नाही कारण की सदर केवायसी ही फक्त महा-ई-सेवा केंद्र चालकच करू शकतात.
राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लवकर ई-केवायसी करावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे झाले जमा
ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला जे बँक खाते लिंक आहे त्या खात्यावरही पैसे जमा झालेले आहेत तसेच ज्या शेतकऱ्याला पीएम मोदीचे पैसे येत होते त्यांच्या खात्यात देखील रक्कम जमा झालेले आहे.
पैसे जमा झाले नाही तर तात्काळ करा हे काम
शेतकरी बंधूंनो मिळालेल्या माहितीप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळग्रस्त चे पैसे आले नाहीत त्यांनी आपल्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडायचे आहे व खात्या उघडल्यानंतर पुढील 3 दिवसांमध्ये त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.
शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपली इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना याविषयीची माहिती मिळेल.