Majhi Ladki Bahin Yojana : नमस्कार बघिनींनो आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की परवाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला होता.
त्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली होती. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 हजार रुपये इतकी रक्कम मिळणार अशी घोषणा देखील करण्यात आलेली होती. Majhi Ladki Bahin Yojana
Majhi Ladki Bahin Yojana
तर भगिनींनो या संदर्भात शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला असून. उद्या म्हणजेच 1 जुलै 2024 पासून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण कोणती कागदपत्रे तयार करून ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून तात्काळ आपल्याला या योजनेचा फॉर्म भरता येईल, याविषयीची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. Majhi Ladki Bahin Yojana
शासन निर्णय पहा
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पहा
- या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- लाभार्थ्याचे आधार कार्ड.
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र {डोमासाईल} /महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
- तहसीलदार यांच्याकडील कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या नावावरील उत्पन्नाचा दाखला व त्यावर बेनिफिशियरी ज्या महिलेच फॉर्म भरायचा आहे तिचे नाव.
- महिलेच्या बँक पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स
- महिलेचा पासपोर्ट साइज फोटो
- रेशन कार्ड
तर माता-भगिनींनो आपल्याला जर या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चा लाभ घ्यायचा असेल तर वरील सर्व कागदपत्रे तात्काळमध्ये तयार करून ठेवा व यासाठी जे अर्ज प्रक्रिया आहे ते उद्यापासून सुरू होणार आहे. Majhi Ladki Bahin Yojana